झुंजार
शोषितांच्या अस्मितेचा जागता अंगार तू
लेखणीने झुंजणारा एकटा झुंजार तू
तापल्या गर्भाला ज्वालामुखी हुंकार तू
माणसांच्या अंतरीचा बोलका झंकार तू
ह्या धरेच्या उत्तरेचा उगवता फंकार तू
कालच्या विश्वातला तो जाळला अंधार तू
ह्या मुक्यांनी काढला जो एकमेव उद्गार तू
तळा तळाच्या माणसांचा हे भिमा उद्धार तू
ध्येयवेड्या माणसांचा हालता एल्गार तू
लाभली ह्या लेखणीला ती तळपती धार तू
भागवत बनसोडे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा