वाईच्या क्रुष्णा नदीच्या पाण्यासारखं निर्मळ मन घेऊन मुंबईला आलेला व पुढे श्रेष्ठ आंबेडकरी ललित लेखक म्हणून नावाजलेला , सज्जन माणूस म्हणजे अशोक चोखू कांबळे! एअर लाइन्स मध्ये कार्यरत असताना, आयुष्यभर मासिके, दिवाळी अंकातून दर्जेदार ललित लेखन करणारे अशोक कांबळे, श्रेष्ठ कथालेखक ठरले. नातेवाईक,मित्र व समाजाविषयी आपुलकी जपणारा एक उल्लेखनीय असा साहित्यिक अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांचा सन्मान म्हणून मी त्यांना सम्राट अशोक संबोधन करायचो . मी त्यांच्यापेक्षा प्रत्येक बाबित लहान असताना सुद्धा ,ते मला दादासाहेब संबोधन करुन त्यांच्या मनाचा मोठेपणा प्रदर्शित करायचे . अशोकजी, तुमचं रूपस्कंध संपलं असलं तरी नामस्कंध अजरामर आहे. तुम्ही वाचले जाणार आहात , तुमच्या कथांच्या पाना पानातून. तुम्ही जाणवणार आहात आम्हाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहातल्या वंदनेतून. तुम्ही बोलणार आहात आमच्याशी शिल्पा,शेखर व शरदच्या मुखातून तुम्ही हसणार आहात आमच्या बरोबर शार्दूल व इतर नातवंडांच्या हसण्यातून. तुम्ही रुसणार आहात आमच्यावर कांबळे ताईंच्या ओघळणा-या अश्रूतून सम्रा...