लोकशाही

 देशात चालवू ही  आम्हीच लोकशाही 

सा-याच बांधवांना देतो लिहून ग्वाही 


एकेक माणसाच्या हातात हात देऊ ;

आता इथे कुणाला काही विरोध नाही !


हे संविधान आहे सा-याच माणसांचे 

सारे मिळून राहू देशात आज भाई !


हे रंग तीन दिसती झेंड्यात भारताच्या 

चक्रास शोभते ही आकाश नीलशाई !


देशात शांतता ही सारेच नांदऊया 

येथे कुणास नाही हा भेदभाव काही !


भागवत बनसोडे



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जेष्ठ गझलकार भागवत बनसोडे यांच्या 'गझल सोहळा' या गझल संग्रहाचा प्रकाशन सोहळा

झुंजार

प्राण