पोस्ट्स

जेष्ठ गझलकार भागवत बनसोडे यांच्या 'गझल सोहळा' या गझल संग्रहाचा प्रकाशन सोहळा

इमेज
डिंपल प्रकाशन मुंबई  (वसई) व  मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय ( दहिसर शाखा)  यांचे संयुक्त विद्यमाने जेष्ठ गझलकार भागवत बनसोडे यांच्या 'गझल सोहळा ' या गझल संग्रहाचे प्रकाशन रविवार दिनांक २३ जुलै २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त शायर डाॅ. संदीप गुप्ते यांचे हस्ते करण्यात आले.   प्रकाशन सोहळ्यास प्रा. गिरीश साळवे , प्रा. आनंद देवडेकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. डॉ. संदीप गुप्ते यांनी, माणुसकी जपणारा  ज्येष्ठ गझलकार व कृतज्ञता जपणारा श्रेष्ठ गझलकार, असे गौरवोद्गार सुनील ओवाळ यांनी काढले . प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. उत्तम भगत यांनी केले.  नंतर डॉ. संदीप गुप्ते यांच्या अध्यक्षतेखाली गझल मैफल संपन्न झाली. संचालन सुनील ओवाळ यांनी केले. भागवत बनसोडे यांच्या पंचाहत्तरी निमित्त सद्धम्म साहित्य संघाच्या वतीने त्यांना मानपत्र, शॉल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

बंध रेशमाचे

इमेज
 Gazal : A band of Silken Thread  This is a  romantic Gazal . He saw her in rain and attracted  towards her.      आले झुकून खाली आभाळ पावसाचे   फेरा धरून येथे रंगीत मोर नाचे ती पावसात आली चिंबून पार गेली तेव्हा जुळून आले हे बंध रेशमाचे हा ऊन-सावलीचा रानात खेळ चाले पाहू चला गड्यांनो हे रंग श्रावणाचे हा गंध वाहताहे माझ्या सभोवताली माझ्या मनात गुंजे ते गीत साजणाचे आनंद वाटणारा हा रम्य काळ आला चोहीकडे सुरू हे संगीत माणसाचे  भागवत बनसोडे

श्रेष्ठ आंबेडकरी ललित लेखक

इमेज
   वाईच्या क्रुष्णा नदीच्या पाण्यासारखं निर्मळ मन  घेऊन मुंबईला आलेला व पुढे श्रेष्ठ आंबेडकरी ललित लेखक म्हणून नावाजलेला , सज्जन माणूस म्हणजे अशोक चोखू कांबळे!  एअर लाइन्स मध्ये कार्यरत असताना, आयुष्यभर मासिके, दिवाळी अंकातून दर्जेदार ललित लेखन करणारे अशोक कांबळे, श्रेष्ठ कथालेखक ठरले. नातेवाईक,मित्र व समाजाविषयी आपुलकी जपणारा एक उल्लेखनीय असा साहित्यिक  अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांचा सन्मान म्हणून मी त्यांना सम्राट अशोक संबोधन करायचो . मी त्यांच्यापेक्षा प्रत्येक बाबित लहान असताना सुद्धा ,ते मला दादासाहेब संबोधन करुन त्यांच्या मनाचा मोठेपणा प्रदर्शित करायचे . अशोकजी, तुमचं रूपस्कंध संपलं असलं तरी नामस्कंध अजरामर आहे.  तुम्ही वाचले जाणार आहात , तुमच्या कथांच्या पाना पानातून. तुम्ही जाणवणार आहात आम्हाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहातल्या  वंदनेतून. तुम्ही बोलणार आहात आमच्याशी शिल्पा,शेखर व शरदच्या मुखातून तुम्ही हसणार आहात आमच्या बरोबर  शार्दूल व इतर नातवंडांच्या हसण्यातून. तुम्ही रुसणार आहात आमच्यावर  कांबळे ताईंच्या ओघळणा-या अश्रूतून सम्रा...

स्म्रुतीशेष माधव खाडिलकर

इमेज
  स्म्रुतीशेष माधव खाडिलकर  यांची महती  कविवर्य भागवत बनसोडे यांनी  * नटवर्य माधव खाडिलकर*  ह्या कवितेत शब्दबद्ध केली आहे मी माधव भागवत ती कविता आपल्या समोर सादर करीत आहे.    * नटवर्य माधव खाडिलकर * माझा देना बँकेतील मित्र  नटवर्य माधव खाडिलकर. कलावंत म्हणून आम्ही दोघे , एकाच वेळी देना बँकेत  रुजू झालो.          बँकेने आमची बसण्याची व्यवस्था एकाच  केबिन मध्ये केल्यामुळे , बँकेत आकडे मोड करता करता   नाटक, कविता व गझलेवर चर्चा होत असे. मला मराठी गझलेकडे वळवणा-या , पार्ल्याच्या दोन व्यक्ती आहेत. एक रविंद्र पिंगे व दुसरे  माधव खाडिलकर. पंधरा दिवसांपूर्वी मी खाडिलकरांना माझा  नवीन प्रकाशित झालेला  गझल संग्रह * गझल - सोहळा " व युट्यूबवरील माझ्या  संगीत बद्ध  गझलांच्या लिंक पाठवल्या होत्या  नऊ दिवसांपूर्वी त्यांचा फोन आला  व  माझ्या गझलांची फार प्रशंसा केली.  अशा ह्या माझ्या लेखक, दिग्दर्शक, निर्माता  व अभिनेता असलेल्या मित्रांशी संवाद साधतो आहे. माधवा ! सांगली...

लोकशाही

इमेज
 देशात चालवू ही  आम्हीच लोकशाही  सा-याच बांधवांना देतो लिहून ग्वाही  एकेक माणसाच्या हातात हात देऊ ; आता इथे कुणाला काही विरोध नाही ! हे संविधान आहे सा-याच माणसांचे  सारे मिळून राहू देशात आज भाई ! हे रंग तीन दिसती झेंड्यात भारताच्या  चक्रास शोभते ही आकाश नीलशाई ! देशात शांतता ही सारेच नांदऊया  येथे कुणास नाही हा भेदभाव काही ! भागवत बनसोडे

संविधान

इमेज
   हे संविधान आता          जाऊन आज पाहू     सारे मिळुन याहो             ह्या भारतात राहू          हे संविधान त्याचे                 आम्हास दान आहे        एकेक शब्द त्याचा               हे धम्मज्ञान आहे     हे गीत वैभवाचे         चिरकाल गात राहू            हा ग्रंथ सोनियाचा                        त्याने बहाल केला             तेव्हाच आपला हा                       देश एक झाला          ह्या भारतात आता             तो बंधुभाव ठेऊ               देशात माणसांच्या...

उन्हात चांदणे

इमेज
  अंगणात तू उभी जणू उन्हात चांदणे !     हे असे नसे बरे उगा तिथेच थांबणे !     आज लाभला जरा निवांत संग थोडका ;    सोड ना सखे तुझे पुन्हा तसेच भांडणे !    मोकळे करून टाक तू मनास आजला ;    मागना सखे तुझे अजून एक मागणे !     गूज सांगतो मला तुझाच आरसा नवा ;    देखणे तुझ्याहुनी तुझे मनात लाजणे !    बोलणे जरी तुझे न आठवे मला पुन्हा ;    ते अजून आठवे तुझे लपून हासणे !    अंगणी सखे तुझ्या पहा वसंत पोचला ;    जाहले पुन्हा सुरु मयूर पंख नाचणे !     भागवत बनसोडे

शाहिर विठ्ठल उमप

इमेज
 महाराष्ट्राला माहित आहे    दोन विठ्ठलांची नावे एक पंढरपूर अन् विक्रोळी     अशी असती त्यांची गावे भीमगीते अन् बुद्ध गीतांचा     सादर केला नजराणा पहाडी आवाजातून उमटला     अपूर्व असा भीम बाणा भजन भारुड गण-गौळण            सादर केली हो लावणी पोवाडा अन् तुंबडी बोबडी      सदा गुंजली धनगर गाणी  मराठमोळी लोककला ही    आयुष्य भर त्याने जपली  शाहिराची गोड गायकी       कोळी गीताने हो सजली  बहुरुपी अन् गोंधळ गाणी            कला अखंड ही सजली जांभूळ आख्यानाने सारी      कारकिर्द शाहिराची नटली शाहिरांचा शाहिर अशी       किर्ती त्याची पसरली गाता गाता नागभूमीवर      प्राण ज्योत ही मालवली कवी    : भागवत बनसोडे

रोज ये तू

इमेज
  वेणीत मोग-याला माळून रोज ये तू !    तो बोल तू दिलेला पाळून रोज ये तू !    अंधार दाटला हा माझ्या सभोवताली ;    आकाश चांदण्यांचे घेऊन रोज ये तू !    पाना-फुलात आता चाहूल घेतसे मी ;    ह्या अंगणात माझ्या बहरून रोज ये तू !    ते फूल ऊंबराचे आता तरी दिसावे ;   वैराण वाळवंटी उमलून रोज ये तू !    माझ्या तुझ्या मनाचे आभाळ एक झाले ;   डोळ्यात भावनांना बसवून रोज ये तू !    वाटेवरी तुझ्या मी थांबून वाट पाही ;   डोळे पु-या जगाचे टाळून रोज ये तू !   भागवत बनसोडे

प्राण

इमेज
  तो तयाचा शब्द त्याने सोडलेला बाण होता !    अन् तयाच्या लेखणीला कायद्याचा मान होता !   शोषुनी ह्या माणसाला पोसले पाषाण सारे ;   भंगण्या येथे तयांना तो महापाषाण होता !    हे असे बंदिस्त होतो भारताचे पूत्र आम्ही ;    पेटलेल्या गुलामांचा एक तो अभिमान होता !   कायदे सम्राट त्याचे विश्व होते मानवाचे ;   भारताला तारणारा तो खरा विद्वान होता !   हा तळाचा गाळ आता त्या अंबराला पोचला ;   शत-युगांनी जन्मलेला तो धरेची शान होता !   वादळे धाऊन येता झुंज तो देऊन गेला ;   लेखणीने झुंजणारा पीडितांचा प्राण होता !    भागवत बनसोडे