श्रेष्ठ आंबेडकरी ललित लेखक

   वाईच्या क्रुष्णा नदीच्या पाण्यासारखं निर्मळ मन 

घेऊन मुंबईला आलेला व पुढे श्रेष्ठ आंबेडकरी ललित

लेखक म्हणून नावाजलेला , सज्जन माणूस म्हणजे

अशोक चोखू कांबळे! 


एअर लाइन्स मध्ये कार्यरत असताना, आयुष्यभर

मासिके, दिवाळी अंकातून दर्जेदार ललित लेखन

करणारे अशोक कांबळे, श्रेष्ठ कथालेखक ठरले.


नातेवाईक,मित्र व समाजाविषयी आपुलकी

जपणारा एक उल्लेखनीय असा साहित्यिक 

अशी त्यांची प्रतिमा आहे.

त्यांचा सन्मान म्हणून मी त्यांना सम्राट अशोक

संबोधन करायचो . मी त्यांच्यापेक्षा प्रत्येक

बाबित लहान असताना सुद्धा ,ते मला दादासाहेब

संबोधन करुन त्यांच्या मनाचा मोठेपणा प्रदर्शित

करायचे .

अशोकजी, तुमचं रूपस्कंध संपलं असलं तरी

नामस्कंध अजरामर आहे. 

तुम्ही वाचले जाणार आहात , तुमच्या कथांच्या

पाना पानातून.

तुम्ही जाणवणार आहात आम्हाला

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहातल्या 

वंदनेतून.

तुम्ही बोलणार आहात आमच्याशी

शिल्पा,शेखर व शरदच्या मुखातून

तुम्ही हसणार आहात आमच्या बरोबर 

शार्दूल व इतर नातवंडांच्या हसण्यातून.

तुम्ही रुसणार आहात आमच्यावर 

कांबळे ताईंच्या ओघळणा-या अश्रूतून

सम्राट

खंत एवढीच आहे 

यापुढे तुम्ही जिव्हाळ्याने मारलेली 

* दादासाहेब * ही हाक कधीही

ऐकायला मिळणार नाही

तुमची शाबासकीची थाप यापुढे 

माझ्या पाठीवर कधीही पडणार नाही.


भागवत बनसोडे



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जेष्ठ गझलकार भागवत बनसोडे यांच्या 'गझल सोहळा' या गझल संग्रहाचा प्रकाशन सोहळा

झुंजार

प्राण