प्राण
तो तयाचा शब्द त्याने सोडलेला बाण होता !
अन् तयाच्या लेखणीला कायद्याचा मान होता !
शोषुनी ह्या माणसाला पोसले पाषाण सारे ;
भंगण्या येथे तयांना तो महापाषाण होता !
हे असे बंदिस्त होतो भारताचे पूत्र आम्ही ;
पेटलेल्या गुलामांचा एक तो अभिमान होता !
कायदे सम्राट त्याचे विश्व होते मानवाचे ;
भारताला तारणारा तो खरा विद्वान होता !
हा तळाचा गाळ आता त्या अंबराला पोचला ;
शत-युगांनी जन्मलेला तो धरेची शान होता !
वादळे धाऊन येता झुंज तो देऊन गेला ;
लेखणीने झुंजणारा पीडितांचा प्राण होता !
भागवत बनसोडे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा