डिंपल प्रकाशन मुंबई (वसई) व मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय ( दहिसर शाखा) यांचे संयुक्त विद्यमाने जेष्ठ गझलकार भागवत बनसोडे यांच्या 'गझल सोहळा ' या गझल संग्रहाचे प्रकाशन रविवार दिनांक २३ जुलै २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त शायर डाॅ. संदीप गुप्ते यांचे हस्ते करण्यात आले. प्रकाशन सोहळ्यास प्रा. गिरीश साळवे , प्रा. आनंद देवडेकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. डॉ. संदीप गुप्ते यांनी, माणुसकी जपणारा ज्येष्ठ गझलकार व कृतज्ञता जपणारा श्रेष्ठ गझलकार, असे गौरवोद्गार सुनील ओवाळ यांनी काढले . प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. उत्तम भगत यांनी केले. नंतर डॉ. संदीप गुप्ते यांच्या अध्यक्षतेखाली गझल मैफल संपन्न झाली. संचालन सुनील ओवाळ यांनी केले. भागवत बनसोडे यांच्या पंचाहत्तरी निमित्त सद्धम्म साहित्य संघाच्या वतीने त्यांना मानपत्र, शॉल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा