स्म्रुतीशेष माधव खाडिलकर

 स्म्रुतीशेष माधव खाडिलकर 

यांची महती 

कविवर्य भागवत बनसोडे यांनी 

* नटवर्य माधव खाडिलकर*

 ह्या कवितेत शब्दबद्ध केली आहे


मी माधव भागवत ती कविता आपल्या समोर

सादर करीत आहे.


   * नटवर्य माधव खाडिलकर *

माझा देना बँकेतील मित्र 

नटवर्य माधव खाडिलकर.

कलावंत म्हणून आम्ही दोघे , एकाच वेळी देना बँकेत 

रुजू झालो. 

        बँकेने आमची बसण्याची व्यवस्था एकाच 

केबिन मध्ये केल्यामुळे , बँकेत आकडे मोड करता करता 

 नाटक, कविता व गझलेवर चर्चा होत असे.

मला मराठी गझलेकडे वळवणा-या , पार्ल्याच्या

दोन व्यक्ती आहेत. एक रविंद्र पिंगे व दुसरे 

माधव खाडिलकर.


पंधरा दिवसांपूर्वी मी खाडिलकरांना माझा 

नवीन प्रकाशित झालेला

 गझल संग्रह

* गझल - सोहळा " व युट्यूबवरील माझ्या 

संगीत बद्ध 

गझलांच्या लिंक पाठवल्या होत्या 

नऊ दिवसांपूर्वी त्यांचा फोन आला  व 

माझ्या गझलांची फार प्रशंसा केली. 

अशा ह्या माझ्या लेखक, दिग्दर्शक, निर्माता 

व अभिनेता असलेल्या मित्रांशी संवाद साधतो आहे.


माधवा !

सांगली सोडून तू दिल्ली गाठलीस अन्

" नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा " मधून 

तू निष्णात कलावंत होऊन बाहेर पडलास.

नंतर जर्मनीला जाऊन जागतिक नाटकांचा 

सुद्धा अभ्यास केलास.

* अनादी मी अनंत मी * करत असतांनाच

तू डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर नाटक

लिहिण्याचा विचार माझ्या समोर मांडला.

आपण माईसाहेब आंबेडकरांशी संपर्क साधला 

परंतु माईंच्या प्रकृती मुळे 

हवी असलेली माहिती

आपल्याला मिळाली नाही.

त्यामुळे 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

यांच्यावर नाटक लिहून

सादर करण्याचे

 तुझे स्वप्न अधुरेच राहिले.


माधवा!

तुझ्या जाण्याने तुझं रुपस्कंध 

जरी संपलं

असलं तरी,तुझं नामस्कंध  अजरामर आहे.

जो पर्यंत मराठी नाट्य सृष्टी आहे, तोपर्यंत

तू आठवला जाणार आहेस.

मुंबईतल्या सर्व नाट्यगृहांमध्ये तुझा धारदार

व करारी आवाज गुंजारव करणार आहे.


माधवा!

तू बोलणार आहेस आमच्या बरोबर

ओंकार व वेदश्रीच्या मुखातून 

तू हसणार आहेस आमच्याशी

तुझ्या नातवंडांच्या हसण्यातून

तू व्यथित होणार आहेस 

आशा ताईंच्या ओघळणाऱ्या

अश्रूंतून 


माधवा!

ओंकार तुझी नाट्य परंपरा सदैव चालूच ठेवणार आहे.


खंत एवढीच आहे

तू मला कविवर्य अशी मारलेली हाक यापुढे मला कधीच 

ऐकू येणार नाही.

माझ्या गझलेसंबंधी तुझी 

शाबासकीची थाप माझ्या पाठीवर यापुढे 

कधीही पडणार नाही.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जेष्ठ गझलकार भागवत बनसोडे यांच्या 'गझल सोहळा' या गझल संग्रहाचा प्रकाशन सोहळा

झुंजार

प्राण