सद्धम्मकार

 १४ आक्टोबर १९५६ च्या धम्मचक्र प्रवर्तना नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या धम्म साहित्य निर्मितीचे काम ,फक्त दोनच संपादकांनी केले आहे. पहिले आहेत राजाभाऊ ढाले व दुसरे आहेत प्रा.आनंद देवडेकर!

राजा ढाले यांनी * धम्म लिपीत व प्रा.आनं देवडेकर यांनी सद्धम्म पत्रिकेत, साहित्यिकांना व एकूण समाजाला दिशा दर्शक विचार  देऊन दीपस्तंभाची  मोठी  जबाबदारी तहहयात सांभाळली आहे.


राजाभाऊ ढालेंची महती श्रेष्ठ गझलकार भागवत बनसोडे यांनी * अस्तित्वाची रेष * ह्या गझलेत यापूर्वीच शब्दबद्ध केली. आता * सद्धम्मकार * ह्या कवितेत भागवत बनसोडे,प्रा.आनंद देवडेकरांचा बहुमान करीत आहेत.


        सद्धम्मकार 

कोकणाच्या निसर्ग रम्य परिसरात

बौद्ध संस्कृतीच्या खाणाखुणा जपणारं

देवडे नावाचं एक गाव आहे 

सद्धम्म पत्रिकेचा द्रष्टा संपादक म्हणून

अख्ख्या महाराष्ट्रात

आनंद देवडेकरांचा नाव आहे


आनंद देवडेकरांच्या प्रत्येक शब्दात 

सद्धम्माची भाषा आहे

सर्व भारतीय साहित्यिकांना

ती एक योग्य दिशा आहे


देवडेकरांच्या प्रत्येक व्याख्यानात 

धम्म इतिहासाची उजळणी आहे

तमाम जनतेला दिशादर्शक अशा 

विचारांची मांडणी आहे 


ध्येय प्रणाली जपणारा 

तासन् तास बोलणारा 

अभ्यासू व्रुत्तिचा वक्ता आहे

महाराष्ट्रात आज देवडेकरांचा 

भाष्यकार म्हणून मक्ता आहे 


आनंद भासतो हा आनंद देवड्याचा 

साहित्य निर्मितीचे हे धम्म पान आहे


भागवत बनसोडे



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जेष्ठ गझलकार भागवत बनसोडे यांच्या 'गझल सोहळा' या गझल संग्रहाचा प्रकाशन सोहळा

झुंजार

प्राण